Posts

Showing posts from September, 2021

३. *रावसाहेब*

                        ३.  रावसाहेब                                                                   इथंच आहे पण दिसत नाही.....वारा. तोच वारा पाच दारा.....पावा. तोच पावा भिंतीत रोवा.....खुंटी........                          .......आज अचानक मला या उखाण्याची आठवण होण्याचं कारणही तसंच घडलं आहे. अगदी अनपेक्षित. एक अशी घटना घडून आली आहे माझ्या जीवनात. हो हो. सांगतो की. पण जरा दम तरी धरा. हं काय झालं बरं? हो. अनपेक्षित एक व्यक्ती माझ्यासमोर आली आणि म्हणाली, "काय रावसाहेब? इथंच हायसा आणि मला कुठं दिसला नाहीसा ते!" या अचानक आलेल्या प्रश्नानं मी तर अगदी गर्भगळीत झालो होतो. एकदम अंगावर वीज कोसळावी तसा मी सुन्न झालो. क्षणभर मला काही कळेनासं झालं. सुचेनासं झालं. तरीपण स्वतःला सावरत मी प्रतिप्रश्न केला...