भीमराव यादव
माझा परम मित्र श्री. परशराम आंबी हा 26 दिवसानंतर कोरोनामुक्त होऊन शनिवार दि. 31.10.2020 रोजी दवाखान्यातून सुखरूप*अस्सल ग्रामीण बाजाचा कथासंग्रह----दावं*
नुकताच सौ. शरयू शेंडगे या ग्रामीण लेखिकेचा पहिलाच 'दावं' हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला. 79 पानी हात छोटासाच कथासंग्रह असून यात एकूण आठ कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. यातील पहिली कथा ' *चैत्र* ' यातील लखन्या हा काहीतरी मिळवण्यासाठी मुंबईला गेला, पण मुंबईनंच त्याला मिळवला. दिवसभर काम करायचा आणि रात्रभर दारूच्या नशेत पडायचा. लग्न केलं , पण संसाराचा गाडा बायकोच चालवायची. याला संसाराचं काही सोयरसुतक नाही. गावाकडं त्याची आई रायना. तिनं दोन मुलींची लग्न करून सासरी पाठवली होती.एकुलता एक लखन्या हा वारसाचा धनी. तो परत येईल या आशेवर असलेली आई , पण लखन्या काही गावाकडे यायचं नावच काढत नाही. यावर्षी चैत्र यात्रेला घरी यायचं त्यानं कबूल केलं . यात्रेच्या दिवशीच तो आला. यात्रेचा सर्व खर्च करण्याचं त्यानं सांगितलं होतं. आई-बहिणी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले होते. येताना त्यांने आई बहिणीला साड्या आणल्या , पण त्या जुन्याच . सगळी यात्रेत गेले , तेव्हा लखन्या घरातच राहिलेला होता . नंतर उठून घरातील सामान घेऊन त्याने विकले आणि दारू पिऊन यात्रेमध्ये आला . भाच्याला पैसे दिले . आईला सारा प्रकार कळला आणि तिने ओळखलं की हे पैसे कसे आले असतील. ती पळतच घरात गेली. दुसरी कथा ' *दौलूतात्या' .* हे त्याचं व्यक्तीचित्र आहे . त्याचं चित्रण सुंदर केलं आहे . काळाकुट्ट गडी , उंची असणारा.कुळवाच्या दांड्या सारखे त्याचे लांब व बारीक पाय . लांबचलांब कामट्यासारखा हात , पांढऱ्या पिळदार मिशा , तीन बटनाचा पांढराखंड पायापर्यंत सदरा, दुटांगी धोतर आणि डोक्यावर लालभडक फटका असा हा इरसाल गडी. स्वतःचे काम स्वतः करणारा पण त्याला समोरून बाई गेली की काहीतरी पांचट बोलण्याची सवय. कोणी भांडायला आलं की शब्द फिरवायचा . तो खळं मागायला शेजारच्या गावात गेला . रात्रीच्या शेवटच्या बसने घरी येत होता . गर्दी खूप झालेली , बसायला जागा नाही. एक व्यक्ती आली त्याला बसायला जागा दिली . त्याला त्याचा राग आला . मंगळवारी बाजारातून परत येताना गर्दीत कंडक्टरचा धक्का लागला . कंडक्टर तिकीट घ्या म्हणाला. कुणाचे ?म्हणाला . आमदार की खासदाराचे ? त्याला काही वाटेल तो बोलू लागला . कंडक्टरने माणसांना खाली उतरवलं . त्याला खाली ठेवला आणि बस चालू केली . त्या रात्री चालत घराकडे येऊ लागला. दारूच्या नशेत गावाच्या स्मशान जवळ आला . तिथेच झोपला तो कायमचाच. तिसरी कथा आहे ती ' *दावं.'* ही शीर्षक कथा. सनक्या या मुलाचं त्याच्या घरातील गाईवर खूप जीव. हरणी ही सर्व जनावरांची लीडर होती. एकदा तिने आजोबाचं धोतर तोंडात धरून ओढत विहिरीपर्यंत आणलं. त्या विहिरीत गाभण म्हैस पडली होती. तेव्हा आजोबा व संनक्यानं म्हैशीला वाचवलं. वर काढले होते, हरणी आजारी होती. तिला दवाखान्यात न्यायचं होतं. घरात पैसे नव्हतं. तेव्हा सनक्या खूप विचारात पडला होता. त्याला त्याच्या शिक्षकाने दोनशे रुपये दिले. आणि हरणीला दवाखान्यात न्यायला सांगितलं. अशा प्रकारे प्राण्यावरती जीव असणारी ही कथा आहे. चौथी कथा ' *झाडाखालची शाळा'.* ही कथा देवदासीच्या मुलीची आहे. ती मुलगी झाडाच्या आडोशाला थांबून गुरुजी शिकवत असलेले ऐकत होती. तिला शाळेत यायला आवडत होते , पण ती जोगतीणीची मुलगी असल्यामुळे तिला शाळेत घालायला समाजाचा विरोध. परंतु शिक्षकाने परिवर्तन केल्यानंतर फुला शाळेत येऊन शिकू लागली. लोकांनी शिक्षकाशी मारामारी केली. त्यामध्ये शिक्षक बेशुद्ध होऊन पडले. कमळाला बातमी कळल्यानंतर तिनं सगळ्या गावकऱ्यांना अडवलं आणि शिक्षकांचे प्राण वाचवले. पाचवी कथा ' *नाटक पहिलं आणि शेवटचं '* गावातल्या हौशी लोकांना नाटक बसवायची हौस. यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून ते नाटक बसवतात. त्या नाटकांमध्ये एक स्त्री पात्र आहे ते करण्यासाठी शहर गावावरून एक नटी आणतात. नाटक सुरु झालेलं . रंगात आलेलं असते. त्याच वेळेला त्यामध्ये असणारा म्हादू. त्यांनं सर्व व्यवस्था केलेली असते. नाटक रंगात येते , त्यावेळेला तेथे त्याचा बा येतो. पोरानं बाईचा हात धरलेला पाहून बाबा स्टेजवर येऊन नाम्याला बडबडू लागला आणि साऱ्या नाटकाचा बट्याबोळ झाला. नाटक बंद पडलं. दुकानदाराची उधारी, सजावट , रिक्षाचं भाडं , मेकअप याचा पाच हजार खर्च पोरांच्या अंगावर बसला. सहावी कथा ' *वाळवी* .' या कथेतील जयवंताला खूप शिकून शिक्षक व्हायची इच्छा आहे. पण दुष्काळानं सारं चित्र नष्ट झालं. फी भरणं कठीण झाले होते. तरी तो बी.एड. झाला . त्याला शिक्षकाची नोकरी आली होती , पण संस्थापकाने नोकरीसाठी पैसे भरायला सांगितले. तेवढे पैसे त्याच्याकडे नव्हते काही जोडणी करून पैसे भरून नोकरी करायचीच असं त्याने ठरवलं. पैसे जमा झाले नाहीत. नोकरी गेली. तो खुळ्यागत करू लागला. आप्पानं हाय खाल्ली. तो मरण पावला . आप्पा गेला आणि दुष्काळ संपला . घर पडू लागलं . घर पडताना वाशातून नोटा पडू लागल्या , पण नोटांना वाळवी लागली होती आणि जयंताच्या स्वप्नांना वाळवीनं मातीमोल केलं होतं . सातवी कथा *'एक घाव '* याकथेत गावातील राजकारण व राजकारणातून होणारी भांडण याचं वर्णन लेखिकेनं केलेलं आहे . राजकारणात कोणकोणते खेळ खेळले जातात , त्याचं वर्णन या कथेत आलेलं आहे. चांगलं काम करणाऱ्याला सुद्धा राजकारणी लोकं काम करू देत नाहीत. हेच या कथेत दाखवलेलं आहे. या कथासंग्रहातील शेवटची। आठवी कथा ' *डांगर भाकरी'* आहे याकथेत ग्रामीण भागात रोजगार करणाऱ्या स्त्रियांच्यावरती कशी वेळ येते त्याचं वर्णन केलेलं आहे . काम नसतं तेव्हा कुर्डूची भाजी , घोळीची भाजी खाऊन दिवस काढावे लागतात. काही वेळेला नाचण्याची भाकर आणि डांगर खाऊन दिवस काढावे लागतात . अशीच परिस्थिती शांतावर आली होती . गावातून फिरली , पण कुणीच काही दिलं नाही. तेव्हा तिच्या चुलत सासऱ्यांननं माणसांसाठी आणलेले जेवण तिला दिलेलं होतं . त्या डांगर भाकरीवरती शांतानं आपल्या मुलाची भूक भागवलेली आहे. सुंदर व वाचनीय असा ग्रामीण भाषेतील हा कथासंग्रह आहे. वाचताना ग्रामीण भागातील चित्र आपल्या नजरेपुढे उभे राहते. काही कथा वाचताना शंकर पाटील यांच्या कथांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 'दावं' कथासंग्रह वाचावा असाच आहे. लेखिकेच्या हातून अशीच साहित्य सेवा व्हावी व ती अधिक दर्जेदार व्हावी असा आशावाद बाळगतो. त्यांच्या पुढील लेखन कार्यास शुभेच्छा देतो. *परशराम आंबी* संमेलनाध्यक्ष २१ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन पणुत्रे
त्यांचे सासरे व मामा पांडुरंग आंबी वय 85 वर्षे हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांचा 40 पैकी 35 कोअर होता. त्यांच्या सेवेला असल्याने तो पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा वेळ न करता त्याने लवकर अॅडमिट होण्याचा निर्णय घेतला. पण दोघेही एकत्र अॅडमिट होते. तेथेही तो त्यांची काळजी घेत होता. पण दहा दिवसांत त्यांच्या सास-यांचे निधन झाले. त्यांचा परिणाम परशरामवर झाला आणि प्रकृती खालावली. आॅक्सिजन लावावा लागला. 13 दिवस आॅक्सिजन लावला होता. पण आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने आता तो पूर्णपणे बरा झालेला आहे.
तसेच या घटनेपूर्वी दोन महिने अगोदर मी खूप आजारी होतो. गावातील डाॅक्टर्सना तब्येत दाखवूनही बरे वाटले नाही. परशरामला जेव्हा कळले तेव्हा त्याने स्वत: मला गाडीवर बसवून रजपूतवाडीतील डाॅ.बी.जी.पाटील यांना दाखवले. एका सलाईनमध्ये मला ठणठणीत बरे वाटले. विशेष म्हणजे डाॅक्टर्सचे बिल स्वतःच भागवले. माझ्या पत्नीला व माझ्या सासूबाईंनाही त्या दवाखान्यात दाखवले. सगळे अगदी ठणठणीत बरे झालो.
पण जेव्हा या माझ्या मित्रावरच कोरोनाने घाला घातला, तेव्हा मला काही सुचेनासे झाले. मी ग्रामदैवताच्या पायावर माथा ठेवला. त्याच्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. देव मला पावला. माझा परम मित्र पूर्णपणे बरा होऊन सुखरूप घरी आला. माझा जीव भांड्यात पडला. सर्वांनाच आनंद झाला.
भीमराव यादव
वरणगे
Comments
Post a Comment