भीमराव यादव
माझा परम मित्र श्री. परशराम आंबी हा 26 दिवसानंतर कोरोनामुक्त होऊन शनिवार दि. 31.10.2020 रोजी दवाखान्यातून सुखरूप*अस्सल ग्रामीण बाजाचा कथासंग्रह----दावं* नुकताच सौ. शरयू शेंडगे या ग्रामीण लेखिकेचा पहिलाच 'दावं' हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला. 79 पानी हात छोटासाच कथासंग्रह असून यात एकूण आठ कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. यातील पहिली कथा ' *चैत्र* ' यातील लखन्या हा काहीतरी मिळवण्यासाठी मुंबईला गेला, पण मुंबईनंच त्याला मिळवला. दिवसभर काम करायचा आणि रात्रभर दारूच्या नशेत पडायचा. लग्न केलं , पण संसाराचा गाडा बायकोच चालवायची. याला संसाराचं काही सोयरसुतक नाही. गावाकडं त्याची आई रायना. तिनं दोन मुलींची लग्न करून सासरी पाठवली होती.एकुलता एक लखन्या हा वारसाचा धनी. तो परत येईल या आशेवर असलेली आई , पण लखन्या काही गावाकडे यायचं नावच काढत नाही. यावर्षी चैत्र ...