घरात राहा , सुरक्षित राहा

"बाबांनू, घरात र्हावा सुखात र्हावा" 
                
                      प्रा.डॉ.गोपाळ गावडे 

चंदगड तालुक्यातल्या नोकरी नतर कामा धंद्यासाठनं  भाईर असल्या सगळ्यास्नं  माझं याक  सांगनं  हाय. त्या कोरोणाचा सगळा जवंजाळ पडलाय. तेचेवर पिल्लेग पडोंदे. एकदसं थांबेबी न्हाय.  तव्वं खल्यानबी  हिकडी  यऊच्या भानगडीत पडो नकाशी. सगळ्या गावात्नं भाईरच्यास्नं  घिऊच बंद केल्यानीत. चुकोन,चोरून खलं  यलंच तर तेला गावात घेन्नाईत. तेला ते.... काय म्हणतात ते ? कॉटरटन काय... काय ते ?  म्हणूसबी  यन्नाय.  ते करतात.
 घरात्नं भाईर पडोस  देन्नाईत.  कुणास भेटोस  देन्नाईत. शाळेत्नं ठिवूल्यात.  सगळ्या पीसवा आनि  डासं  भरल्यात त्या  शाळेत.  तेच्यापरास हाईचा तितेच यवस्सीर  र्हावा.
       आत्तं चुरणं  सगळी सपल्यात. काजवा उलागल्यात. करंदं तवढी हाईत. धामणं काय आजून पिकोस न्हाईत. खरं जांभळं पिकोल्यात. फणसबी पिकोल्यात. खरं येक वरीस  न्हाय खालं  म्हणून काय मरोस व्हताय  ?  जगलाव- वाचलाव  तर पुढल्या वर्सी खाऊस मिळतील. यवढं काय तेच्यात?
       पयली लोकं म्हणीत, चंदगडची माण्सं लई हिमतीची, लई ताकतीची व्हत्ती. "येक चंदापुरी दस कोलापुरी" म्हणीत. आत्तबी  सगळ्यांनी येक हून तीच ताकत दाखवूया. परतेकान आपली आपली काळजी घिऊया. तोंडास ते मुस्क बांधोस  सांगटल्यानीत. परतेकान ते बांधोन घिऊस व्हयेत.  आनि येक म्हत्वाचं  सांगतो, " ह्या लाकडावनात लोकांचा काम धंदा बुडालाय. लोकांच्या जेवणा- खाणाचं वांदं  झालय. कुणास मदत करूस जमली तर, जरा आपल्यापरीन करा. आपला मुखमंत्री किती कळवळोन सांगताय ते बघटल्याशीत नय? तेंचं जरा आयकोस पायजेत.
    उंडगी पोरं गाडीवयनं इनाकारण फिरोल्यात. आरे, पोलीस बापडे उन्हातानात आपलेसाठनं राबताईत. तेस्नं तरास दिऊ नकोशी. नतर इनाकारण   हाकनाक मरशीला.
 आपल्यातल्या लई जणांस्नं  परतेक आठुड्यास मटण  नतर मासे लागतात, मला म्हाईत हाय.  खरं, घरात हिळवान आणल्याशी की म  घोमान्सास्नं दारूबी लागताय. यकात्नं याक  वाढेत जाताय. यवढा म्हैना मनावर धोंडा ठेवा . आनि हां.. ही मुंबई - पुण्यास्नं  आल्ल्या पोरांच्याडे चार पैसे हाईत. म्हणून ' सारखं पार्ट्या  करूल्यात ' म्हणून पेपरात वाचलो. आरे बाबांनू,असं काय करू नकाशा. फुडे कसले दिवस यतील कुणासदक्कल? माण्साची लई आतताई  चाल्लंन्नाय .म्हणून सगळ्यांस्नं  हात जुडून इनंती करतोय, " बाबांनू,  घरात र्हावा  सुखात र्हावा".
  :-  प्रा.डॉ गोपाळ गावडे, नागणवाडी

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी