चाचणी १

लाॅकडाऊन कालावधीतील चाचणी पहिली.
इ.९ वी मराठी कृतिपत्रिका एकूण गुण =२०
प्रश्न (अ) गद्य: प्रीतम - ५ गुण खालील प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.
१.प्रीतम पाठाच्या लेखिका........
अ) पद्मा गोळे
ब) जयश्री गडकर
क)माधुरी शानभाग
२.प्रीतमचे आडनाव.....
अ) जोशी
ब) पाटील
क)लुथरा
३.प्रीतमचा स्वभाव असा नव्हता.......
अ) एकलकोंडा
ब)बडबड्या
क)घुमा
४.प्रीतमला मराठीशिवाय येत असणारी भाषा......
अ) पंजाबी
ब) कन्नड
क) उर्दू
५.प्रीतमच्या .....लेखनात चुका आढळल्या.
अ) कथा
ब)कविता
क)निबंध
प्रश्न (ब) पद्य वनवासी - ५ गुण
खालील प्रश्नांच्या उत्तरातील योग्य वर्णाक्षर लिहा.
१.वनवासी कवितेचे कवी/कवयित्री ...........
अ)तुकाराम धांडे
ब) पद्मा गोळे
क)संदीप खरे
२.भोकर हे ......आहे.
अ)फूल
ब)फळ
 क)भाजी
३.वनवासी कवितेत वर्णन केलेला समाज......... अ)आदिवासी     
ब)भटका
 क)आर्य
४.कवितेत आलेल्या उपग्रहाचे नाव.......
अ) सूर्य
ब) चंद्र
क)सिंह
५. आकाश या शब्दाला कवितेत आलेले शब्द......
अ)आभाळ ,चंद्र
ब) गगन ,सूर्य
क) गगन, आभाळ
प्रश्न (क)व्याकरण - ५ गुण
१.खालील ओळीतील अलंकार ओळखा.
य.शेतात चांगले उगवलेले आवडते.
र.सकाळच्या न्याहरीस झाडे काळा वायू घेतात.
२.खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.
अ) वाक्प्रचार : - १. टकळी चालवणे
२.डोळे भरून येणे ३.काबाडकष्ट करणे
ब)अर्थ :- य) दु:ख होणे
र) खूप काम करणे
ल)सतत बोलणे
प्रश्न (ड) उपयोजित लेखन ५ गुण
खालीलपैकी एका विषयावर उपयोजित लेखन करा.
१. 'घरी बसा आणि कोरोनावर विजय मिळवा' या विषयावर निबंध लेखन करा.
२. 'लाॅकडाऊन संधी की शिक्षा ' यावर तुमचे मत लिहा.
३. अारोग्यविषयक एका वस्तूची जाहिरात लेखन करा.

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील