अाज ब्लाॅग सुरु करतोय

लाॅकडाऊन कालावधीत मी   नाट्यछटा   लिहिली आहे.

नाट्यछटा--' हाच विश्वास '
  ये आई ,
मला बाहेर जाऊ दे ना!
असं सारखं सारखं  का गं मला अडवतेस?......
काय म्हणतेस? कोण आलंय? कोरोना ?
तो आणि कुठून आला आहे गं? आणि म्हणून जगातली सगळी माणसं अशी कोंडून घेऊन बसल्यात होय?
पण आई ,
कोरोना म्हणजे काय गं?.... 'तो व्हायरस आहे...'
अगं व्हायरस म्हणजे काय गं? हं...व्हायरस म्हणजे विषाणू . या विषाणूंमुळेच अापण आजारी पडतो ना!
बर्फाचा गोळा खाल्ला की सर्दी होते.
घाणीत खेळलो की ताप येतो. मग अापल्याला डाॅक्टरमामाकडं जावं लागतं आणि इंजेक्शन टोचून घ्यावं लागतं.
काय म्हणतेस गं आजी? आजारी पाडणारे विषाणू आहेत तसेच उपयोगी पडणारेही विषाणू आहेत .
ते गं कोणते?
...हो, बरोबर दुधाचे दही बनवणारे पण विषाणू आहेत.
हे सारं आमच्या विज्ञानाच्या सरांनी सांगितलं आहे.
उपयोगी विषाणू आणि निरुपयोगी विषाणू. 
पण हा कोरोनाचा विषाणू फारच भयंकारी आहे .
याच्यावर अजून लसही उपलब्ध नाही.
अगं आजी ,
हा विषाणू मरत नाही म्हणं!
'का मरत नाही?'
असं काय गं आजी!
तो मरंलच कसा?
कारण तो निर्जीव आहे आणि तो विषाणूंचा पुंजका आहे. 
त्याच्यावर अजून औषध नाही की लसही उपलब्ध नाही.
त्याच्यापासून वाचायचे असेल तर एक आणि एकच पर्याय आहे.
'.... तो आणखी कोणता?'
आजोबा तुम्ही विचारताय असं ? अहो , एवढं सोपं तुम्हांला कसं हो समजत नाही?
अहो,  आपण एकमेकांच्या पासून दूर राहायचं. 
अहो, 
शेजारच्या काकांनी त्यांच्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलंय तसं. ...तसं नव्हं हो.
अहो,  माझे बाबा तुम्हांला कसे ठेवतील वृद्धाश्रमात.
मी कसं जाऊ देईन तुम्हांला घरातून....हं. .. ..बरं, मी काय सांगत होतो. अहो ! आपण घरातच राहायचं पण आपल्यात दोन मीटरचं अंतर ठेवून. आणि बरं का तोंडावर मास्क किंवा रूमाल बांधून. 
.....आई , पाहिलंस का तू? कशी पटाटा माणसं मरायला लागलीत ती.
आपल्या देशात नव्हं गं! इटली,  फ्रान्स , अमेरिका या देशात.
.....काय म्हणताय आजोबा?
अशी परिस्थिती आली होती या अगोदर? 
१९१९ च्या काळात?
ती आणि कशाची? 
प्लेगची . प्लेगची साथ.
काय म्हणताय? पटापट माणसं मरायची?
एकाला स्मशानात पोहोचवून आलं की दुसरं तयार.
अशी महामारी आली होती तेव्हा?
अहो आजोबा , तेव्हा उचलायला माणसं तरी यायची, पण आता या कोरोनाची साथ आली तर उचलायलाही कोण यायचं नाही. 
किंवा उचलायला कुणीही राहायचं नाही अशी परिस्थिती व्हायची. 
म्हणून म्हणतो की सुरक्षित राहा. सुरक्षित अंतर ठेवा. साबणाने सारखे सारखे हात स्वच्छ धुवा.
सुरक्षित अंतर ठेवू, कोरोनावर विजय मिळवू.
"एकच श्वास अन् एकच ध्यास कोरोनावर विजय हा विश्वास."

परशराम आंबी

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील