Posts

Showing posts from May, 2024

जागरण - आत्मकथन लेखक - भारत सातपुते

*जागरण* - आत्मकथन           लेखक - भारत सातपुते          घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि कष्टाची असूनसुद्धा भारत सातपुते यांनी आपल्या प्रामाणिकपणामुळे, जिद्दीमुळे आणि चिकाटीने परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश म्हणजे धकधकती ज्वालाच.                *जागरण* या आपल्या आत्मकथनामध्ये त्यांनी आपल्या जीवनाचे सार मांडलेले आहे. त्यांचे *जागरण* हे आत्मकथन माझ्या वाचनात आले. सुरुवातीस वाचताना जागरण म्हणजे गोंधळी समाजाने धार्मिक कार्यात घातलेल्या गोंधळाचे जागरण आहे असे वाटले. पण जसजसे वाचत गेलो, तसतसे लेखक भारत सातपुते यांनी स्वराज्याबरोबर सुराज्यासाठी निर्भीडपणे देशभक्तांनी कसे जागरण केले, देशासाठी बलिदान दिले. अशा देशभक्तांना ही साहित्यकृती अर्पण केलेली आहे हे वाचताना दिसून येते.             भारत सातपुते यांनी बालसाहित्य, व्यक्तिचरित्रे, कथासंग्रह, काव्यसंग्रह, वात्रटिका संग्रह अशा विविध प्रकारात लेखन केले आहे. त्यांनी ६० पेक्षा जास्त साहित्यकृतीचे लेखन केलेले आहे. त्यांच्...